Sanjay Raut : संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार, पुढे काय निर्णय?
ईडीच्या विशेष न्यायालयानं त्यांना 22 ऑगस्टपर्यंत म्हणजे आजपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊतांची न्यायालयीन कोठडी वाढवून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असं बोललं जातंयॉ. आज काय होणार याकडे लक्ष.
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊतांना (Sanjay Raut) पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 31 जुलैला ईडीनं रात्री उशीरा ताब्यात घेतलं होतं. त्यांना आठ दिवस त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. ईडीच्या विशेष न्यायालयानं त्यांना 22 ऑगस्टपर्यंत म्हणजे आजपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढवून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असं बोललं जातंयॉ. त्यामुळे न्यायालयात आज काय होणार याकडे लक्ष लागून आहे. संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलंय. सकाळी दहा वाजेच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता जेजे रुग्णालयात (J J Hospital) नेलं. ही तपासणी झाल्यानंतर ईडीचे अधिकारी (ED Officials) त्यांना कोर्टासमोर हजर करतील. त्यामुळे आज काय होतं, याकडे लक्ष लागून आहे.
Published on: Aug 22, 2022 11:18 AM
Latest Videos