“2024 ची निवडणूक देशाची शेवटची निवडणूक”, ठाकरे गटाचं सूचक विधान
पाटण्यात आज देशातील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. बैठकीसाठी संजय राऊतही रवाना झालेत. देशभरातील 15 शक्तीशाली विरोधी नेत्यांनी या बैठकीत हजेरी लावली. इथे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला, असे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान या बैठकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.
मुंबई : पाटण्यात आज देशातील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. बैठकीसाठी संजय राऊतही रवाना झालेत. देशभरातील 15 शक्तीशाली विरोधी नेत्यांनी या बैठकीत हजेरी लावली. इथे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला, असे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान या बैठकीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे. “2024 ची निवडणूक ही बहुधा देशाची शेवटची निवडणूक असेल, असं संपूर्ण देशाचे मत आहे. भाजप वगळता देशातील प्रमुख पक्ष आज पाटण्यात जमले आहेत. देशातील प्रमुख पक्ष जे लोकशाहीला मानतात ते आज पाटण्यामध्ये एकत्र आले आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.
Published on: Jun 23, 2023 05:46 PM
Latest Videos