राष्ट्रवादीच्या बंडावर संजय राऊत यांची मोदी-शाहांवर टीका, म्हणाले, “कोंबड्या झुंजवून…”
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुंबईत बुधवारी दोन बैठका झाल्या. पहिली बैठक ही अजित पवार यांची झाली, तर दुसरी शरद पवार यांची झाली. या दोन्ही बैठकांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुंबईत बुधवारी दोन बैठका झाल्या. पहिली बैठक ही अजित पवार यांची झाली, तर दुसरी शरद पवार यांची झाली. या दोन्ही बैठकांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “भाजपने शिवसेनेसोबत जे केलं, तेच राष्ट्रवादीबाबतीत सुद्धा केलं. जमीनीवरच्या पक्षाला फोडायचं दोन गटाला झुंजावत ठेवायचं ही भाजपची नीती आहे. भाजपने सिनिअर पवार आणि ज्युनिअर पवारांमध्ये भांडण लावलं. महाराष्ट्रातल्या कोंबड्या झुंजवून दिल्लीतले बादशाह मजा घेत आहे.तोडा, फोडा आणि राज्य करा असं भाजप करत आहे,” असं राऊत म्हणाले.
Published on: Jul 06, 2023 08:40 AM
Latest Videos