Special Report | Sanjay Raut | संजय राऊत म्हणतात आणखी धक्का बसणार, लवकर सत्तांतर होणार'?

Special Report | Sanjay Raut | संजय राऊत म्हणतात आणखी धक्का बसणार, लवकर सत्तांतर होणार’?

| Updated on: Jul 28, 2022 | 11:08 PM

एकनाथ शिंदे कायदेशीर लढाईत अडकलेत. एक तर सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन सुनावणी सुरु आहे. दुसरीकडे सर्वच आमदारांना मंत्रिपदं शिंदेंना देता येणार नाही. त्यामुळं शिंदे गटातच फूट पडले असं राऊतांना वाटतंय, आणि त्यावरुन आमदार संपर्कात असल्याचंही ते सांगतायत..

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारला, जेमतेम एक महिना होतोय. त्यातच आता शिवसेनेच्या संजय राऊतांनी(Sanjay Raut) सत्तांतराचा दावा केलाय. शिंदे गटातले आमदार आमच्या संपर्कात असून, सरकार पडण्याचा दावाच राऊतांचा आहे. शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही. असंच साधारण सर्व घडामोडींवरून चित्र निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे कायदेशीर लढाईत अडकलेत. एक तर सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन सुनावणी सुरु आहे. दुसरीकडे सर्वच आमदारांना मंत्रिपदं शिंदेंना देता येणार नाही. त्यामुळं शिंदे गटातच फूट पडले असं राऊतांना वाटतंय, आणि त्यावरुन आमदार संपर्कात असल्याचंही ते सांगतायत. मदार फुटून गुवाहाटीत गेले त्यावेळीही राऊत आमदार संपर्कात असल्याचं सांगत होते..आता सरकार स्थापन झाल्यावरही शिंदे गटातले आमदार संपर्कात असल्याचं राऊत म्हणतायत. यावरुन अजित पवारांनीच संजय राऊतांना टोला लगावलाय

Published on: Jul 28, 2022 11:07 PM