सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची सत्तारांकडून लूट? संजय राऊत म्हणाले, या औरंग्याच्या पेकाटात…

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची सत्तारांकडून लूट? संजय राऊत म्हणाले, “या औरंग्याच्या पेकाटात…”

| Updated on: Jun 18, 2023 | 12:16 PM

कृषिमंत्रिपदाचा कारभार स्विकारल्यापासून मंत्री अब्दुल सत्तार सातत्याने कोणत्या ना कोणत्या वादात सापडत आहेत. दरम्यान कृषी विभागाच्या कथित पथकाने अकोल्यामध्ये टाकलेल्या धाडीचं प्रकरण ताजं असताना सत्तारांचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्तारांवर एक गंभीर आरोप केला आहे.

मुंबई : कृषिमंत्रिपदाचा कारभार स्विकारल्यापासून मंत्री अब्दुल सत्तार सातत्याने कोणत्या ना कोणत्या वादात सापडत आहेत. दरम्यान कृषी विभागाच्या कथित पथकाने अकोल्यामध्ये टाकलेल्या धाडीचं प्रकरण ताजं असताना सत्तारांचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्तारांवर एक गंभीर आरोप केला आहे. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचे भूखंड सत्तार यांनी गिळल्याचे आरोप राऊत यांनी केले आहे. तर याबाबत त्यांनी ट्वीट करत फडणवीस यांना लक्ष घालण्याची मागणी देखील केली आहे. अब्दुल सत्तारांची या प्रकरणी सामनामध्ये छापून आलेल्या बातमीचे कात्रण आणि एक पत्र राऊतांनी या ट्वीटमध्ये जोडले आहे. संजय राऊत यांनी नेमकं काय ट्वीट केलंय, यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jun 18, 2023 12:16 PM