Sanjay Raut : घटनेचा पेच निर्माण झाल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला, शिवसेना नेते संजय राऊतांचा आरोप
दोन मंत्र्यांवर सरकार चालवता येत नाही. त्यासाठी किमान 12 मंत्र्यांची गरज आहे, असा दावा संजय राऊत यांनी यापूर्वी केला आहे. संजय राऊत एवढ्यावरच न थांबता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी ही मागणी देखील करताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरुन (Cabinet Expansion) जोरदार राजकीय आरोप- प्रत्यारोप होतायत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सरकारच बेकायदेशीर (Cm Eknath Shinde) असल्याचं सांगत आहेत. घटनेचा दाखला देत दोन मंत्र्यांवर सरकार चालवता येत नाही. त्यासाठी किमान 12 मंत्र्यांची गरज आहे, असा दावा संजय राऊत यांनी यापूर्वी केला आहे. संजय राऊत एवढ्यावरच न थांबता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी ही मागणी देखील करताना दिसत आहेत. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील पलटवार केलाय. तर शेलार यांनीही घटनेचा दाखला देत राऊतांचा मुद्दा खोडून काढलाय. दरम्यान, आज पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केलीय. त्यांनी काय म्हटलंय पाहुया….
Published on: Jul 17, 2022 10:32 AM
Latest Videos