संजय राऊत यांनी 48 पैकी 49 जागा मागायला हव्या होत्या, खासदार प्रतापराव जाधव यांचा खोचक सल्ला
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी नवरवर्षाच्या पूर्वसंध्येला टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जादा खासदार निवडून आणण्याच ध्यैय असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. गेल्यावेळी धनुष्यबाण निशाणीवर जेवढ्या जागा शिवसेने लढल्या तेवढ्या जागा आम्हाला हव्या आहे. परंतू तीन पक्ष असल्याने शेवटचा निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेईल असे त्यांनी म्हटले आहे.
बुलडाणा | 31 डिसेंबर 2023 : नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी 45 पेक्षा जादा खासदार महाराष्ट्रातून निवडून पाठविण्याचे आमचे ध्येय्य आहे. साधारणत: मागच्या शिवसेनेने जेवढ्या जागा लढविल्या होत्या तेवढ्या जागा आम्हाला हव्या आहेत. शिवसेना आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत, बाळासाहेबांचे नाव आमच्या सोबत आहे, बाळासाहेबांना मिळालेली निशाणी धनुष्यबाण आमच्या सोबत आहे. मागच्या वेळी धनुष्यबाणावर ज्या मतदार संघात निवडून झाली त्या जागा आम्हाला द्याव्यात. आता याउपर वरिष्ठ निर्णय घेतील असे एकनाथ गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे. 22 जागा मिळाल्या पाहीजे अशी आमची मागणी आहे. निवडून येण्याची ताकद उमेदवारांना संधी दिली. पाहीजे. संजय राऊत यांनी 23 जागा मागितल्या आहे. यावर विचारले असता त्यांनी त्यांच्या स्वभावानूसार 48 जागा पैकी 49 जागा मागायला हव्या होत्या असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे.