“तेव्हा अजितदादा एकनाथ शिंदे यांना ज्युनिअर म्हणायचे आणि आता…”, संजय राऊत यांचा टोला
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. तसेच अजित पवार यांच्यासह इतर आमदारांनी मंत्रीपदाची शपथही घेतली आहे. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांना एक सवाल केला आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. तसेच अजित पवार यांच्यासह इतर आमदारांनी मंत्रीपदाची शपथही घेतली आहे. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांना एक सवाल केला आहे. ते म्हणाले की, “महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात येणार होतं. त्यावेळी शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे आलं होतं. तेव्हा शिंदे यांच्या नावाला विरोध झाला होता. कोणत्याही ज्युनिअर नेत्याच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. ही त्यांची अट होती. आम्ही त्यांना समजावलं. एकनाथ शिंदे ज्युनिअर नाहीयेत. अनेक वर्ष ते राजकारणात आहेत. तेव्हा मुख्यमंत्री पदाचा निर्णय व्हायचा होता. पण ज्युनिअर व्यक्तीच्या हाताखाली काम न करण्याची त्यांची अट होती. आज मात्र काम करत आहेत. हाफ उपमुख्यमंत्रीपदावर निभावून नेलं आहे,” असा टोला राऊत यांनी अजित पवार यांना नाव न घेता लगावला.