“आम्ही अतिरेकी आहोत काय?…तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा”, संजय राऊत यांनी का केली मागणी?
मुंबई महापालिकेत गेल्या एका वर्षापासून मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने एक जुलै रोजी महापालिकेवर महामोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र ठाकरे गटाची मोर्चाची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा हाती घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेत गेल्या एका वर्षापासून मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने एक जुलै रोजी महापालिकेवर महामोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र ठाकरे गटाची मोर्चाची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा हाती घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, त्या कारणासाठी आमचा मुंबईतील मोर्चा नाकारला जात असेल तर आम्ही कोण आहोत. आम्ही काय अतिरेकी आहोत का? कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात गृहमंत्री फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.बाळासाहेब ठाकरे यांना शासनाने राष्ट्रपुरुषांचा दर्जा दिला आहे. त्यांचा अपमान केल्याप्रकरणी त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. 40 वर्षानंतर शिवसेनेची ती शाखा बेकायदेशीर आहे, हे कळलं का? शाखा पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरून आदेश आलेत. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मिस्टर फडणवीस तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत,” असं संजय राऊत म्हणाले.