“सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये जाऊन शुद्ध झाले”, चक्की पिसिंगवरुन संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावर निशाणा
अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मुंबई, 23 जुलै 2023 | अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार चक्की पिसिंग अॅण्ड चक्की पिसिंग’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसिंगचा नारा दिला होता. त्याच्या या नाऱ्यांमध्ये हे सगळे भ्रष्टाचारी त्यांच्या पक्षात गेले आणि शुद्ध झाले. आम्ही काय करणार आमच्यावर चक्की पिसण्याची वेळ आली. योग्य वेळी बोलू. त्याचा खुलासा आपोआप होईल.”
Published on: Jul 23, 2023 12:06 PM
Latest Videos