“तुम्ही केली ती कुटनीती, आम्ही केली ती काय?”, संजय राऊत यांचा पलटवार
भाजपच्या कार्यक्रमात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली असल्याचं म्हणतं, 2019 चा इतिहास पुन्हा सांगितला. दुसरीकडे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: भाजपच्या कार्यक्रमात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली असल्याचं म्हणतं, 2019 चा इतिहास पुन्हा सांगितला. दुसरीकडे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ठाण्यात काल हास्यजत्रेचे दोन शो पार पडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री आणि फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांचे हे शो होते. शपथेबाबत किती खोटं बोलतात हे लोक. उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली असा दावा केला जातोय. खरंतर हा पोहरादेवीचा अपमान आहे. मला सकाळपासून त्या समाजातील अनेकांचे फोन येताहेत की देवेंद्र फडणवीस आमच्या पोहरादेवीचा अपमान करत आहेत. पोहरादेवीची शपथ कोणी खोटी घेत नाही. हे जागृत देवस्थान आहे. पण हे सर्व खोटारडे लोक पोहरादेवीला खोटे पाडतात. ठाकरे गट राष्ट्रवादीसोबत जाणं हा अधर्म आहे. हे राजकारण आहे. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणून अधर्म आणि तुम्ही गेलात ती चाणक्यनिती?”, संजय राऊत पुढे काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…