Sanjay Raut मर्द शिवसैनिक आहे, घाबरण्याचा प्रश्नच नाही, राऊतांचं नवीन ट्विट
पोलिस बदल्यांचा घोटाळा प्रकरणात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांकडून जवाब नोंदवण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. भाजपच्या नेत्यांनी राज्यभरात पोलिसांच्या नोटिशीची (Police Notice) होळी करत फडणवीसांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केलाय.
पोलिस बदल्यांचा घोटाळा प्रकरणात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांकडून जवाब नोंदवण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. भाजपच्या नेत्यांनी राज्यभरात पोलिसांच्या नोटिशीची (Police Notice) होळी करत फडणवीसांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केलाय. दरम्यान, पोलिसांनी जवाब नोंदवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. यावेळी फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही हल्ला चढवलाय. फडणवीसांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटे पणाने कारवाया करतात याचा पोलखोल करण्यासाठी मी दोन पत्रकार परिषद घेतल्या.पुराव्यासह. इतकेही खोटे बोलू नका’, असा सल्लाही राऊत यांनी फडणवीसांना दिलाय.