Shambhuraje Desai | संजय राऊत जी भाषा बोलतात, तीच भाषा उद्धव ठाकरे यांच्या तोंडी, त्यामुळे वेदना होतात, शंभुराजे देसाई यांचे वक्तव्य

Shambhuraje Desai | संजय राऊत जी भाषा बोलतात, तीच भाषा उद्धव ठाकरे यांच्या तोंडी, त्यामुळे वेदना होतात, शंभुराजे देसाई यांचे वक्तव्य

| Updated on: Jul 26, 2022 | 4:33 PM

Shambhuraje Desai | संजय राऊत यांच्या तोंडी जी भाषा आहे, तीच भाषा उद्धव ठाकरे यांच्या तोंडी असल्याने दुख होत असल्याचा आरोप शंभुराजे देसाई यांनी केला आहे.

Shambhuraje Desai | उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) यांची संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर त्यावर आता भाजपसहीत बंडखोर आमदारांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली. त्यानंतर याविषयावर बंडखोर आमदार शंभुराजे देसाई (Shambhuraje Desai ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या तोंडी असलेली भाषा या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या तोंडी आल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी हाणला. उद्धव ठाकरे यांच्याविषयी आदर आहे, त्यांनी आम्हाला पालापोचाळासारख्या उपाध्या देऊ नये अशी अपेक्षा ही देसाई यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) 40 आमदारांची कोंडी झाल्यानेच त्यांनी वेगळा होण्याची भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वेळोवेळी आमदारांची मुस्काटदाबी सूरु असल्याबाबतची कल्पना दिली होती. त्यांच्या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून (Nationalist Party) निधी देताना डावलण्यात येत असल्याचा मुद्दा ही ठाकरे यांच्या कानावर घालण्यात आल्याचे पण त्यांनी काहीच भूमिका न घेतल्याने नाईलाजाने हे पाऊल टाकावे लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.