“अजित पवार यांचं ‘ते’ वक्तव्य दुर्लक्षित करण्यासारखं नाही”, ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत काल कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी यांनी महत्वाचं विधान केलं आहे. एकीकडे ठाकरे गटाची आणि वंचितची युती आहे आणि वंचितला महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी प्रयत्नही सुरु आहेत. असं असताना अजित पवार यांनी वंचित आणि बीआरएसकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत काल कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी यांनी महत्वाचं विधान केलं आहे. एकीकडे ठाकरे गटाची आणि वंचितची युती आहे आणि वंचितला महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी प्रयत्नही सुरु आहेत. असं असताना अजित पवार यांनी वंचित आणि बीआरएसकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रकाश आंबेडकर तेलंगणाला गेले होते. सध्या बीआरएसला त्यांच्यापेक्षा आपल्या राज्यात जास्त इंटरेस्ट आहे. ते सर्वांना संपर्क साधत आहेत. त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही, असं विधान केलं आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “अजित पवार बरोबर बोलले आहेत. मतांच्या विभाजनाचं राजकारण व्हावं यासाठी शिंदे आणि भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. अजित पवाराचं वक्तव्य दुर्लक्षित करण्यासारखं नाही.”