केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचारी, राऊतांच्या रडारवर तपास यंत्रणा

केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचारी, राऊतांच्या रडारवर तपास यंत्रणा

| Updated on: Mar 08, 2022 | 10:50 AM

केंद्रीय तपास यंत्रणा किती भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत. कुणाच्या नियंत्रणाखाली काम करतात. राजकीय विरोधकांची कोंडी करून त्यांना अडचणीत आणून या यंत्रणा भाजपच्या राजकारणाला हातभार लावतात. हे सर्व त्या पत्रात आहे. असे संजय राऊत यांनी सांगितले.

ठाणे: ईडीबाबत (ed) मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (pm narendra modi) 13 पानांचं पुराव्यासह पत्रं दिलं आहे. अनेकांचा आग्रह आहे की ते पत्रं मीडियासमोर ठेवावं, देशासमोर ठेवावं. ते पत्रं आज मी तुम्हाला देईन. त्या पत्रावरून तुम्हाला कळेल की केंद्रीय तपास यंत्रणा किती भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत. कुणाच्या नियंत्रणाखाली काम करतात. राजकीय विरोधकांची कोंडी करून त्यांना अडचणीत आणून या यंत्रणा भाजपच्या राजकारणाला हातभार लावतात. हे सर्व त्या पत्रात आहे. हे टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज त्यातला पहिला भाग बाहेर काढणार आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र, तपास यंत्रणांवर कोणता बॉम्ब टाकणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. त्यामुळे राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Mar 08, 2022 10:50 AM