Sanjay Raut | मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानंतर तरी खासदार कुठे थांबले? संजय राऊत यांचा बंडखोर खासदारांच्या निष्ठेवर सवाल
Sanjay Raut | खासदारांनी त्यांना पाठिंबा देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावेळी पाठिंबा दिल्यानं तुमची भूमिका बदलणार आहे का? असा सवाल ठाकरे यांनी या खासदारांना विचारला होता.
Sanjay Raut | शिवसेनेने राष्ट्रपती पदाच्या उमेदवार (President Candidate) द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. शिवसेनेने राष्ट्रपती निवडणूकीत एनडीएला पाठिंबा दिला नसून उमेदवाराला पाठिंबा दिला तर उपराष्ट्रपती पदी विरोधकांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदारांनी त्यांना पाठिंबा देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावेळी पाठिंबा दिल्यानं तुमची भूमिका बदलणार आहे का? असा सवाल ठाकरे यांनी या खासदारांना विचारला होता. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानंतरही खासदार (Shivsena) शिवसेनेत थांबले का, असा सवालही त्यांनी यावेळी केला आणि त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्हं उभं केलं.शिवसेनेतून गेलेले लोक कारणे शोधत असतात.त्यांनी बंडखोरांचाही समाचार घेतला.
महाराष्ट्र पुरात बुडतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्लीत राजकारण करत असल्याचा निशाणा शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी साधला. मंत्रीमंडळाचा राज्यात पत्ता नाही. राज्यात सरकारच नाही. या सरकारवर टांगती तलवार आहे. कधी हे सरकार जाईल सांगता येत नाही, असा दावा ही त्यांनी केला. तसेच भाजप नेते रावसाहेब दानवे यांची त्यांच्या पक्षावर निष्ठा आहे, तशी माझी शिवसेनेवर निष्ठा असल्याचे ते म्हटले. शिवसेना ही प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.