फडणवीस यांना बोलू द्या, आमच्या जागा वाढतात, मविआ महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवणार? काय म्हणाले राऊत?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा समाचार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांना बोलू द्या, ते असं बोलले की, आमच्या जागा वाढतात.
नांदेड : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा समाचार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांना बोलू द्या, ते असं बोलले की, आमच्या जागा वाढतात. कर्नाटकमध्ये गुजरात पॅटर्न राबवला पण कर्नाटकच्या जनतेने तो पॅटर्न उधळून लावला. महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन होईल, असा दावा राऊत यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आठ मागण्या केल्या, पण एकही मान्य केली असं फडणवीस यांनी बोलणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्यासारखं असल्याचे, संजय राऊत म्हणाले. पुण्यात राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
Published on: May 19, 2023 10:10 AM
Latest Videos