Video | संजय राऊत म्हणाले, मलाही कुंडली कळते, 'त्यांना' येत्या काही महिन्यांत....

Video | संजय राऊत म्हणाले, मलाही कुंडली कळते, ‘त्यांना’ येत्या काही महिन्यांत….

| Updated on: Nov 25, 2022 | 11:07 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डी येथे दर्शन घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका महादेवाच्या मंदिरात गेले. तेथील ज्योतिष्यांना मुख्यमंत्र्यांनी हात दाखवून भविष्य विचारल्याची चर्चा रंगली आहे.

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिष्याकडे गेल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. त्यावरून शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना टोमणा मारला आहे. ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो, तेच लोक ज्योतिष्यासमोर हात दाखवतात. मलाही कुंडली कळते आणि त्यांच्या कुंडलीत, येत्या काही महिन्यात स्तेतचा योग नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसोबत कामाख्या देवीला जाणार आहेत. यावरूनही राऊत यांनी टीका केली. जे अघोरी विद्येच्या पाठी लागतात, त्यांचा अंतही अघोरीच होतो, असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डी येथे दर्शन घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका महादेवाच्या मंदिरात गेले. तेथील ज्योतिष्यांना मुख्यमंत्र्यांनी हात दाखवून भविष्य विचारल्याची चर्चा रंगली आहे.

 

 

Published on: Nov 25, 2022 11:07 AM