कोणी गद्दार महाराष्ट्रात निपजला असले तर त्याला मातीत गाडल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसत नाही – संजय राऊत
देशाचं रक्षण करणं हा महाराष्ट्राचा पिढीजात धंदा आहे. कुणी गद्दार या मातीत निपजला असेल तर त्याला मातीत गाडल्याशिवाय राहणीर नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
दुसऱ्यांना हिंदुत्व (Hindutwa) शिकवतात आणि काल त्यांनी ज्या पद्धतीने देशद्रोही व्यक्तीची बाजू घेऊन वकिली करण्याचा प्रयत्न केला. ते पाहून गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, डॉ. हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मोहन भागवत यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रीय यंत्रणांचा खुळखुळा केला आहे. शक्ती प्रदर्शन नाही. तुम्ही आमच्या पाठिमागून कितीही वार करा. शिवसैनिकांचं (Shivsainik) मनोबल खचलं नाही. उलट आम्ही अधिक जोरात आहोत. भाजपच्या भ्रष्टाचाऱ्यांना जातील तिथे जोड्या मारल्याशिवाय जनता राहणार नाही. तुमची नाटकं आणि नौटंक्या खूप झाल्या. देशाचं रक्षण करणं हा महाराष्ट्राचा पिढीजात धंदा आहे. कुणी गद्दार या मातीत निपजला असेल तर त्याला मातीत गाडल्याशिवाय राहणीर नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.