मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ | भाजप हा पक्ष विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा आहे. राज्यात बेकायदेशीर सरकारला वाचवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस गंडलेले लोखंड असेल तर भाजप हा गांजलेला पक्ष आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधण्यात आलाय. तर काँग्रेस गंजलेले लोखंड असेल तर भाजप हा गांजलेला पक्ष आहे. गंज काढण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. मात्र गांजलेल्यांचे वैफल्य आणि नैराश्य दूर करणे कठीण असते, असे म्हणत सामनातून खोचक टीका करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्रासारख्या राज्यात बेकायदेशीर , घटनाबाह्य सरकारला वाचवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. सर्वाच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे सरकार बेकायदा ठकरवूनही ते सरकार चालू देणं हे गंजलेल्या मेंदूचे आणि विचारांचे लक्षण आहे. ‘