राऊत म्हणाले, ‘गुजरातचे मुख्यमंत्री का बदलले’, आता नितेश राणे म्हणतात, ‘मुंबईचे पालिका आयुक्त का बदलले?’
शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबात पुन्हा एकदा सवाल-जवाबाला सुरुवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज अग्रलेख लिहून गुजरातच्या बदललेल्या मुख्यमंत्र्यावरुन भाजपवर टीका केली. त्यांच्या याच टीकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबात पुन्हा एकदा सवाल-जवाबाला सुरुवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज अग्रलेख लिहून गुजरातच्या बदललेल्या मुख्यमंत्र्यावरुन भाजपवर टीका केली. त्यांच्या याच टीकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा मॉडेलवर बोला, असा सल्ला त्यांनी राऊतांना दिलाय.
राणे vs राऊत संघर्ष पुन्हा सुरु
गुजरातचा मुख्यमंत्री का बदलाल हा आमच्या पक्षाचा विषय आहे. आमच्या गुजरात मॉडेलवर बोलण्यापेक्षा तुम्ही मुंबई मॉडेलवर बोला ना… तुम्ही भर कोरोनाकाळात आयुक्त परदेशी यांची बदली का केली?, असा उलटसवाल नितेश राणे यांनी राऊत यांना विचारला.