Sanjay Raut यांचे Kirit Somaiya आणि Neel Somaiya यांच्यावर वक्तव्य

Sanjay Raut यांचे Kirit Somaiya आणि Neel Somaiya यांच्यावर वक्तव्य

| Updated on: Apr 11, 2022 | 12:34 PM

शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आयएनएस विक्रांत (vikrant) प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र आणि देशाची फसवणूक करणारे दोन ठग कुठे आहेत? हा मोठा सवाल आहे. हे दोघे पळून जाऊ शकतात, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आयएनएस विक्रांत (vikrant) प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र आणि देशाची फसवणूक करणारे दोन ठग कुठे आहेत? हा मोठा सवाल आहे. हे दोघे पळून जाऊ शकतात, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपकडून या दोघांची माहिती का दिली जात नाही? त्यांना कुठे लपवले आहे? हे दोघेही बापबेटे महाराष्ट्राच्या बाहेर असल्याची मला पक्की शंका आहे. त्यांना कोणत्या राज्यात लपवलं आहे. हे दोघेही केंद्रातून अंतरिम बेलची सेटिंग करत असल्याची भीती आहे. पण त्यांची सेटिंग होणार नाही. गुन्हा दाखल झाल्यापासून सोमय्या आणि त्यांचा मुलगा गायब आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सोमय्या पिता-पुत्रावर हल्लाबोल केला आहे.

Published on: Apr 11, 2022 12:28 PM