Devendra Fadnavis : आमचं सरकार येण्यास संजय राऊतांचा मोठा वाटा, देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना टोला
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये वार-पलटवार सुरू आहे. सकाळी 9 वाजता वाजणारं लाऊडस्पीकर बंद करण्यासाठीचं सत्ता परिवर्तन हवं होतं, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये वार-पलटवार सुरू आहे. सकाळी 9 वाजता वाजणारं लाऊडस्पीकर बंद करण्यासाठीचं सत्ता परिवर्तन हवं होतं, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. पण, नऊ नाही, तर दिवसभर आम्ही बोलत राहू, असा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. फडणवीस म्हणाले, सकाळी 9 वाजता वाजणारे लाऊडस्पीकर कमी बोलायला लागले. त्यांचे आभार माना सत्ता येण्यात त्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा इतर कुणाचाच नाही. महाराष्ट्राच्या जनतेला आणि नेत्यांना त्यांनी वैगात आणल्याचं फडणवीस म्हणाले. तर संजय राऊत यांनी पलटवार केला. ते म्हणाले, गेली 56 वर्षे शिवसेनेचा लाऊडस्पीकर सुरू आहे. कुणी उतरवायची आणि बंद करण्याची हिंमत करू शकले नाही. शिवसेनेचा लाऊडस्पीकर हा शिवसेनेचा बुलंद आवाज आहे. आम्हाला जे बोलायचं ते निर्भिडपणे, बेडरपणे बोलतो. परिणामाची परवा करत नाही.