Sanjay Raut | …तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी या केसरकर यांच्या धमकीवर राऊत यांची प्रतिक्रीया
केसरकर यांनी संजय राऊत यांनी 2024 मध्ये जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा दिला. तसेच संजय राऊत वारंवार दहशतवाद्यांसारखी भाषा वापरत आहेत. चुकून कुणी अशा शब्दांमुळे त्यांचा जामीन रद्द करण्याची विनंती कोर्टाकडे करू शकते, असेही ते म्हणाले.
मुंबई : राज्यातील वादंग सुरू असतानाच आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आला आहे. शिंदे गटाचे मंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जुंपली आहे. राऊत यांनी शिंदे गटाचा टोळी असा उल्लेख करत टोळी ही गँगवार किंवा पोलीसांच्या इन्काँटरमध्ये मारले जातात असे म्हटलं होते. त्यावर आता शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी इशारा दिला आहे.
केसरकर यांनी संजय राऊत यांनी 2024 मध्ये जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा दिला. तसेच संजय राऊत वारंवार दहशतवाद्यांसारखी भाषा वापरत आहेत. चुकून कुणी अशा शब्दांमुळे त्यांचा जामीन रद्द करण्याची विनंती कोर्टाकडे करू शकते, असेही ते म्हणाले.
यावर राऊत यांनी केसरकर आपल्याला धमकवत असल्याचे म्हटलं आहे. तर केसरकर यांनीही तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, असं संजय राऊत म्हणालेत. तर केंद्रीय गृहमंत्री आणि फडणवीस या धमक्यांवर लक्ष देतील असा विश्वास असल्याचेही राऊत यांनी म्हटलं आहे.