“महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न…”; पवार-मोदी भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थित होती. त्यामुळे शरद पवारही भाजपसोबत जातील अशा चर्चांना उधाण आलें. या चर्चांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थित होती. राष्ट्रवादीत फूट आणि भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतरही शरद पवार मोदींसह एकाच मंचावर असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शरद पवार आणि मोदींच्या कार्यक्रमाविषयी वाद निर्माण झाले आहेत. पण आम्ही त्यावर पडदा टाकू. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न झाला, महाराष्ट्राला कमजोर आणि अपमानित करण्याचा प्रयत्न झाला, जेव्हा जेव्हा दिल्लीच्या शत्रूंनी रात्रीच्या अंधारात महाराष्ट्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राईक केला. हे पवार साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळे पुढल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी शरद पवार आमच्यासोबत नक्कीच राहतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.”