Kirit Somaiya प्रकरणात पडल्यास राजभवनाची उरलेली इज्जतही जाईल – Sanjay Raut यांचा घणाघात
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना अटक होऊ नये म्हणून त्यांच्या माफिया टोळीचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना अटक होऊ नये म्हणून त्यांच्या माफिया टोळीचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. राऊत म्हणाले की, “रविवारपासून राजभवनात (raj bhavan) सोमय्यांच्या माफिया टोळीचे लोक सारखे जात आहेत. जुन्या तारखेचे कागदपत्रं तयार करत आहेत. मी राजभवनाला इशारा देतो. राजभवनाने या भानगडीत पडू नये. देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये. अन्यथा राजभवनाची उरलेली इभ्रतही जाईल.” सोमय्या आणि विक्रांत घोटाळा प्रकरणात न पडण्याचा इशारा राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला आहे. राऊत म्हणाले की, सोमय्या आणि त्यांच्या टोळीने लोकांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेला हा घोटाळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. त्याची व्याप्ती मोठी आहे. राज्याबाहेरही या घोटाळ्याचं लोण आहे. त्यामुळे किरीट आणि नील सोमय्या हे दोन्ही लफंगे बापबेटे लपून बसले आहेत. अंतरीम जामीन मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने सेटिंग करत आहेत. मात्र, त्यांना जामीन मिळणार नाही.