Sanjay Shirsat | अंबादास दानवे आम्हाला शिकवणार का? संजय शिरसाट यांचा टोमणा
Sanjay Shirsat | अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
Sanjay Shirsat | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्याच्या (Aurangabad District) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याअगोदर, आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद रॅली काढली होती. त्या रॅलीच्या धास्तीनेच शिंदे हे औरंगाबाद दौऱ्यावर आल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा आ. संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी आम्हाला शिवसेना (Shivsena) काय आहे ते शिकवू नये, असा टोला त्यांनी लगावला. हा दौरा आमदारांच्या मतदार संघात काय काय कामे बाकी आहेत, कुठे काय समस्या आहेत त्यासाठी असल्याचे वक्तव्य शिरसाट यांनी केलं. हा शिंदे सेनाचा दौरा नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचा हा दौरा असल्याचे ही ते सांगायला विसरले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेशी शिंदे गट पाईक असल्याने हीच शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले.