ठाकरे गटातील आणखी नेते प्रवेश करतील; शिंदे गटातील शिरसाट यांनी नावचं सांगितलं, आता कोण करणार प्रवेश?
त्यांच्याबरोबर मुंबईतील तीन नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावनरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुंबई : आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांच्याबरोबर मुंबईतील तीन नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावनरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच ठाकरे गटातील अजून अनेक नेते हे शिंदे गटात प्रवेश करतील असही त्यांनी म्हटलं आहे. तर ठाकरे गटातील दुसऱ्या मोठ्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे शिरसाट म्हणाले. याचबरोबर शिरसाट यांनी, या लोकांना माहित आहे की पुर्ण आयुष्य शिवसेनेसाठी देऊनही हे लोक आपले ऐकत नाहीत. ते आपले झालेच नाहीत. त्यामुळे अनेक जन हे शिंदे गटात शिवसेनेत प्रवेश करतील. हवं तर वर्धापनाच्या दिवशी पहा किती लोक, नेत प्रवेशासाठी येतील.