‘राऊत बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करतोय’; शिवसेना नेत्याची टीका, तर उद्धव ठाकरे याच्यावरही साधला निशाना
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. तसेच समृद्धी महामार्गाला शापित असं म्हटलं होतं. त्यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना टीका केली आहे.
मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर खाजगी बसला अपघात झाल्याने 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. तसेच समृद्धी महामार्गाला शापित असं म्हटलं होतं. त्यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना टीका केली आहे. त्यांनी राऊत यांच्या डोल्यावर परिणाम झाला आहे. तो एक दिवस कोण उद्धव ठाकरे असं विचारेल तर आदित्य ठाकरे माझ्यानंतरचा नेता म्हणेल. तर संजय इज द ग्रेट असेच काहीसं तो बोलेल अशी खरमरीत टीका शिरसाट यांनी राऊत यांच्यावर केली आहे. तर राऊत आणि शरद पवार यांनी शिवसेना कशी संपवली याच्यावर तो पुस्तक ही लिहेल असा टोला ही त्यांनी लागवला आहे. तर समृद्धी महामार्ग हा बाळासाहेब ठाकरे यांच्याने ओळखला जातो. तर ते या महामार्गाला शापित म्हणत असतील तर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा अपमान करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.