एक दिवस अजितदादा उठाव करतील, शिवसेनेच्या नेत्याची प्रतिक्रिया

“एक दिवस अजितदादा उठाव करतील”, शिवसेनेच्या नेत्याची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 23, 2023 | 4:19 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी अजित पवार यांनी विरोध पक्षनेते पदावरून मुक्त करा आणि संघटनेमधील जबाबदारी द्या, असं विधान केलं. त्यांच्या या विधानावरून शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी अजित पवार यांनी विरोध पक्षनेते पदावरून मुक्त करा आणि संघटनेमधील जबाबदारी द्या, असं विधान केलं. त्यांच्या या विधानावरून शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पदासाठी दावेदार आहेत आणि आज तेच राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पक्षाची जबाबदाराची केविलवाणी विनंती करत होते. अजित पवार हेच राष्ट्रवादीला पुढे घेऊन जातील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. पण त्यांच्याच पक्षातील काही लोकांना अजित पवारांना राष्ट्रवादीचं प्रमुख करणं आवडत नाही. त्यामुळे एक दिवस अजितदादा नक्की उठाव करती,” अशी भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली.

Published on: Jun 23, 2023 04:19 PM