इम्तियाज जलील बाळासाहेबांबद्दल बोलाल तर याद राखा, चांगलाच धडा शिकवू; शिवसेना आक्रमक

इम्तियाज जलील बाळासाहेबांबद्दल बोलाल तर याद राखा, चांगलाच धडा शिकवू; शिवसेना आक्रमक

| Updated on: Mar 07, 2023 | 3:27 PM

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : आमच्या शहरातले भस्म लावून फिरणारे लोक जलीलबद्दल एकही शब्द काढत नाहीत. हे लोक बाळासाहेबांचे विचार टिकवणारे नाहीतर विकणारे आहेत, असं शिरसाट म्हणाले आहेत. पाहा व्हीडिओ...

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. “इम्तियाज जलील विचारतो की, बाळासाहेब कोण? इम्तियाज हा हैदराबादचा असल्यामुळे त्याला बाळासाहेब नीट कळलेले नाहीत. ही निजामाची औलाद आहे. मी त्याला इशारा देतोय की, बाळासाहेबांबद्दल बोलायचं नाही. जर पुन्हा बोलला तर चांगला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असं शिरसाट म्हणाले आहेत. जलील येऊन बाळासाहेबांबद्दल बोलतो. त्याला विरोध करत नाहीत.मग काय इम्तियाज जलील सोबत बिर्याणी खाणार का? असा सवाल शिरसाट यांनी अंबादास दानवे यांना विचारला आहे.

Published on: Mar 07, 2023 03:27 PM