“मातोश्रीवरची सुरक्षा ही राजकीय हेतून…”, ठाकरे कुटुंबाची सुरक्षा काढण्यावर संजय शिरसाट म्हणतात…
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी 750 कोटी रुपयांचं मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. या आरोपांना आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
औरंगाबाद : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी 750 कोटी रुपयांचं मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. या आरोपांना आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊत रोज वेगवेगळ्या मंत्र्यांवर आरोप करत असतात, हा वेगळा प्रकार आहे, जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत या आरोपांना काहीही तथ्य नाही, आरोप करून कुणालाही भ्रष्टाचारी ठरवता येत नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तर ते सिद्ध करा”, असं संजय शिरसाट म्हणाले. “तसेच मातोश्रीवरची सुरक्षा ही राजकीय हेतून काढलेली नाही, गृहविभागाची एक समिती असते त्यांनी हा निर्णय घेतला आहे,” असं संजय शिरसाट म्हणाले.
Published on: Jun 22, 2023 04:27 PM
Latest Videos