अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिवसेनेतील 2 आमदार भिडले? संजय शिरसाट म्हणतात, विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न...

अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिवसेनेतील 2 आमदार भिडले? संजय शिरसाट म्हणतात, “विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न…”

| Updated on: Jul 06, 2023 | 3:16 PM

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे.शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कालच्या बैठकीतही शिंदे गटात राडा झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे.शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कालच्या बैठकीतही शिंदे गटात राडा झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कालच्या बैठकीत काही घडलंही नाही, काही बिघडलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आल्यामुळे नेमका समन्वय कसा साधायचा, काय करायचं, कुणासोबत कसा समन्वय साधयाचं यावर चर्चा झाली. तसेच जी विकासाची कामं आहेत, ती पूर्ण करायची यावर केवळ साधक बादक ही चर्चा होती. आमदारांची भांडण झाली ही धादांतं खोटी बातमी आहे. आम्ही एकमेकांच्या बोकांडी बसून मंत्रिपद मिळवण्याचा प्रयत्न करतोय, असं दाखवण्याचा विरोधकांच्या हा सगळा केविलवाणा प्रयत्न आहे,” असं संजय शिरसाट म्हणाले.

Published on: Jul 06, 2023 03:16 PM