Sanjay Raut यांच्या गळ्यात शरद पवारांचा पट्टा की उद्धव ठाकरे यांचा?, कुणी केला थेट सवाल?

| Updated on: Oct 11, 2023 | 4:22 PM

VIDEO | तुमच्या गळ्यात एक पट्टा बांधलाय भंगार असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर सडकून टीका करत घणाघात केला होता. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे, बघा काय केला हल्लाबोल

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | तुमच्या गळ्यात एक पट्टा बांधलाय भंगार असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका करत घणाघात केला होता. यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी काही लोकांचे पट्टे काढलेत. संजय राऊत यांच्या गळ्यात नेमका कोणाचा पट्टा आहे, शरद पवारांचा पट्टा की उद्धव ठाकरे यांचा? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे. इतकंच नाही तर संजय राऊत यांची प्राण्याशी तुलना करत त्यांनी आधी पहावं असे म्हणत त्यांना खोचक टोलाही लगावला आहे. दोन दोन पट्टे गळ्यात बांधणारे संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायला काही वाटत नाही, असे म्हणत सडकून टीका केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नादी लागू नका असे म्हणत त्यांनी राऊतांना इशारा दिला आहे.

Published on: Oct 11, 2023 04:22 PM
Eknath Shinde यांचा नक्षलवाद्यांच्या हस्ते एन्काऊंटर करण्याचा प्लान होता, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
Sharad Pawar : शरद पवार यांच्या भाषणात गौतमी पाटील हिचा उल्लेख, नेमकं काय म्हणाले?