Sanjay Shirsat | राम मंदिरासाठी शिंदेंनी दिलेले पैसे राऊतांनी घरी ठेवले की काय, संजय शिरसाटांचा आरोप

Sanjay Shirsat | राम मंदिरासाठी शिंदेंनी दिलेले पैसे राऊतांनी घरी ठेवले की काय, संजय शिरसाटांचा आरोप

| Updated on: Aug 01, 2022 | 11:47 AM

पत्रचाळ पुनर्विकासात आर्थिक अफरातफर झाल्याच्या आरोपांखाली काल त्यांची 9 तास चौकशी झाली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या झालेल्या या चौकशीनंतर राऊतांना अटक करण्यात आली. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

मुंबई : राम मंदिरासाठी शिंदेंनी दिलेले पैसे राऊतांनी घरी ठेवले की काय, असा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut Ed Inquiry) यांच्यावर केला आहे. पत्राचाळ पुनर्विकासात आर्थिक अफरातफर झाल्याच्या आरोपांखाली काल त्यांची 9 तास चौकशी झाली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या झालेल्या या चौकशीनंतर राऊतांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली. यावेळी त्यांच्याकडे काही पैसे आढळून आले. त्यापैकी एका बंडलवर अयोध्या असं लिहिलं होतं. हाच मुद्दा पकडून आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. दरम्यान, शिवसेनेकडून टीखट प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोलण्यास नकार दिला आहे. यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर भाजपकडून मात्र हल्लाबोल सुरू आहे. सध्या राजकीय वर्तुळात राऊत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

Published on: Aug 01, 2022 11:47 AM