संजय सिंह यांच्या जामीनातून भाजपची पोल खुलली आहे, संजय राऊत यांचा आरोप
भाजपाने सिंधुदुर्ग-रत्नागिरीत नारायण राणे यांना उतरावेतच आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहात आहोत. येथून विनायक राऊत मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई : भाजपाचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर भाजपाची पतझड सुरु झाली आहे का असा प्रश्न मिडीयाने हिंदीतून विचारला तेव्हा शिवसेना नेते संजय राऊत यांनी पतझ़ड नाही संपूर्ण वृक्षच उन्मळून पडणार आहे. या वृक्षांची मुळे ईडी आणि सीबीआय आहेत असा दावा केला आहे. संजय सिंह यांनी कोर्टाने दिलेल्या जामीनाने भाजपाची पोल खुलली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. भाजपा केवळ त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवित आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांत देश भ्रष्टाचार आणि सामाजिक विद्वेषात जळत आहे. देशाला मोदींना कमजोर केले असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपा आता चारशे पारचा नारा देत असला तरी काही दिवसांनी नारे देण्याच्याही लायकीचा राहणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. भाजपाने अखंड हिंदुस्थान करु, पाकव्याप्त कश्मीर भारतात आणू, चीनला धडा शिकवू हे नारे भाजपाने दिले होते त्याचे काय झाले असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. इंडिया आघाडीने पंतप्रधानाचा चेहरा दिलेला नाही असा प्रश्न विचारला असता आता गेली दहा वर्षे जनता या चेहऱ्याला कंठाळली असून आता तर या चेहऱ्याला घाबरत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.