चंद्रपुरात संत कोंड्या महाराज धाबा यात्रा, भक्तांची अग्निपरीक्षा घेणारा सोहळा
महाराष्ट्र (Maharashtra) - तेलंगणातील आराध्य दैवत म्हणजे चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील संत परमंस कोंडय्या महाराज. महाराजांचा यात्रा महोत्सव सध्या संतनगरी 'धाबा' (Dhabba)n येथे सूरु आहे
महाराष्ट्र (Maharashtra) – तेलंगणातील आराध्य दैवत म्हणजे चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील संत परमंस कोंडय्या महाराज. महाराजांचा यात्रा महोत्सव सध्या संतनगरी ‘धाबा’ (Dhabba)n येथे सूरु आहे. या महोत्सवातील मुख्य आकर्षण म्हणजे ” अग्निकुंड प्रभावळ “. पवित्र श्रध्देचा बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्याचे दाखले पुराणात सापडतात. भक्तिची अग्नीपरीक्षा घेण्याचा असाच थरारक सोहळा धाबा दरवर्षी आयोजित केला जातो. संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात लालबुंद निखा-याने तूडुंब भरलेल्या कुंडातून भक्त अनवाणी पायाने चालत जातात. यंदाही हा सोहळा वयोवृध्द, बालगोपालांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी चौकोनी खड्डा खणला जातो. त्या खड्यात मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जातात. जळालेल्या लाकडाच्या तयार झालेल्या निखा-यांची विधिवत पुजा केली जाते. आणि मग या निखा-यावरून चालण्याच्या थरारक सोहळ्याला सूरवात होते.
Published on: Feb 04, 2022 11:29 AM
Latest Videos