हस्तांदोलन करण्यासाठी आशिष शेलार यांनी हात पुढे केला, पण संतोष बांगर थेट पायाच पडले...

हस्तांदोलन करण्यासाठी आशिष शेलार यांनी हात पुढे केला, पण संतोष बांगर थेट पायाच पडले…

| Updated on: Feb 27, 2023 | 11:56 AM

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. या अधिवेशनादरम्यानच्या एका व्हीडिओची जोरदार चर्चा होतेय. पाहा...

मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर पहिल्यांदाच हे अधिवेशन होतंय. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनादरम्यानच्या एका व्हीडिओची जोरदार चर्चा होतेय. भाजपचे नेते आशिष शेलार विधिमंडळ परिसरात आले. तेव्हा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर समोर दिसताच शेलारांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. बांगर यांनी हातात हात दिला. शिवाय ते थेट शेलारांच्या पाया पडले. याचा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Published on: Feb 27, 2023 11:56 AM