Santosh Bangar playing Dafli Viral | विसर्जन मिरवणुकीत संतोष बांगर यांनी वाजवली डफली

| Updated on: Sep 10, 2022 | 12:57 AM

मिरवणूक गांधी चौकात पोहचताच  शिंदे गटाचे बंडखोर खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी "तुमने तो देखा है" या डीजेच्या गाण्यावर ठेका धरला होता.

हिंगोली : हिंगोलीत गणपती विसर्जनाच्या  मिरवणुका सर्वत्र शांततेत पार पडत आहेत. शहरातील वंजारवाडा भागातील शेतकरी बाल गणेश मंडाळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत घोडे, आदिवासी नृत्य आकर्षण होते. मिरवणूक गांधी चौकात पोहचताच  शिंदे गटाचे बंडखोर खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी “तुमने तो देखा है” या डीजेच्या गाण्यावर ठेका धरला होता. नृत्याची डफडी वाजवत आणि बँडवर ही आमदार बांगर यांनी ठेका धरला.

Published on: Sep 10, 2022 12:57 AM