Santosh Deshukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय? कोणत्या आरोपीचे सापडले ठसे
Santosh Deshmukh Case Forensic Report : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता हत्येच्यावेळी वापरण्यात आलेल्या गाडीचे फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आलेले आहेत. या गाडीवर बोटांचे ठसे असल्याचं आढळून आलं आहे.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पुरावे आढळलेल्या गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट आता समोर आला आहे. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गाडीच्या काचांवर बोटांचे ठसे आढळले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 3 महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आलेली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात होता. सध्या या प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू आहे. त्यानंतर आता हत्येचे पुरावे सापडलेल्या गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. यात गाडीच्या काचांवर बोटांचे ठसे असल्याचं म्हंटलं आहे. तर हे ठसे आरोपी सुधीर सांगळे याचे असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आरोपींना शिक्षे पर्यंत पोहोचवण्यासाठी हेच रिपोर्टस महत्वाचे ठरणार आहेत.