Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णु चाटे याचा शास्त्र परवाण्याचा अर्ज नाकारण्यात आलेला आहे. घटने पूर्वी त्याने शस्त्र परवाण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
आरोपी विष्णु चाटे याचा शास्त्र परवाना रद्द नाकारण्यात आलेला आहे. विष्णु चाटे हा बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी आहे. या प्रकरणात त्याच्यावर आणि या गुन्ह्यातील इतर आरोपींवर मकोका देखील लावण्यात आलेला आहे. या हत्येच्या घटने आधी विष्णु चाटे याने शस्त्र परवाण्यासाठी अर्ज केलेला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर हा परवाना नाकारण्यात आलेला आहे.
3 महिन्यांपूर्वी विष्णु चाटे आणि त्याच्या इतर 8 साथीदारांनी बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केली होती. यातील 1 आरोपी अजूनही फरार आहे. तर विष्णु चाटे आणि इतर 6 आरोपी कोठडीत आहेत.
Published on: Mar 18, 2025 04:29 PM
Latest Videos