Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ? संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ? संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA

| Updated on: Jan 11, 2025 | 1:48 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का (MCOCA) लावण्यात आला आहे. यामुळे पोलिसांना तपासासाठी १८० दिवसांचा कालावधी मिळेल आणि आरोपपत्र सादर करण्याची मुदत वाढेल. मोक्का हा संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीचा कायदा आहे ज्यामुळे आरोपींना जामीन मिळणे कठीण होईल. वाल्मिक कराड याला मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे पण त्याला अद्याप अटक झालेली नाही.

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींसदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले,प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे या सर्व आरोपीवर मोक्का लावण्यात आला आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे, पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडवर मोक्का लावलेला नाही.

MCOCA लागल्यानं काय होणार ?

बीड हत्या प्रकरणात मकोका लागल्याने पोलिसांना तपासासाठी 180 दिवस मिळणार आहेत.
मकोका लागल्याने या प्रकरणात पोलीस 180 दिवसांत आरोपपत्र दाखल करू शकतात.
मकोका हा संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीचा कायदा असल्याने त्यामध्ये लवकर जामीन मिळत नाही.
मकोका लागल्याने एखाद्या आरोपीचा कबुलीजबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो.

Published on: Jan 11, 2025 01:48 PM