नॉट रिचेबल मुश्रीफ कागलमध्ये दाखल; ईडी समोर जाणार नाहीत
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर घरावर छापे टाकले. मुश्रीफ यांची चौकशीही करण्यात आली होती. तर पुढील चौकशीसाठी समन्स बजावले होते.
कागल : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरण आणि ब्रिक्स कंपनीवरुन ईडीने दीड महिन्यात तीनदा राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर घरावर छापे टाकले. मुश्रीफ यांची चौकशीही करण्यात आली होती. तर पुढील चौकशीसाठी समन्स बजावले होते. दरम्यान, मुश्रीफ हे नॉट रिचेबल झाले होते. छाप्यासंदर्भात त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र 2 दिवसानंतर मुश्रीफ आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे मुश्रीफ हे ईडी समोर जाणार नसून ते त्यांच्या वकिलांमार्फत ईडीला त्यांचे म्हणणे मांडणार आहेत. तर नॉट रिचेबल झालेल्या हसन मुश्रीफ थेट कागलमध्ये आल्याने पक्षाला आणि कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Published on: Mar 13, 2023 12:35 PM
Latest Videos