सातारा-महाबळेश्वर मार्गावर दरड कोसळली; सह्याद्री टेकर्सकडून दगड हटवण्याचं काम सुरु
महाबळेश्वर परिसरातही जोरदार पाऊस सुरु असल्याने सातारा-महाबळेश्वर मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. काल झालेल्या पावसामुळे सातारा महाबळेश्वर रस्त्यावर असलेल्या केळघर घाटात दरड कोसळली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसासह मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस अजूनही काही भागात सुरु आहे. कालपासून महाबळेश्वर परिसरातही जोरदार पाऊस सुरु असल्याने सातारा-महाबळेश्वर मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. काल झालेल्या पावसामुळे सातारा महाबळेश्वर रस्त्यावर असलेल्या केळघर घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळून बराच उशीर झाल्यानंतरही घटनास्थळी अजून जिल्हाधिकारी पोहचले नाहीत. त्यामुळे सह्याद्री टेकर्सकडून मात्र दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आला आहे. मोठे मोठ दगड रस्त्यावर कोसळल्याने सातारा-महाबळेश्वर मार्गावर लांब लांब रांगा लागल्या होत्या.
Published on: Sep 15, 2022 11:04 AM
Latest Videos