आमदार शिवेंद्रराजेंचं साताऱ्यात पारडं जड…; खासदारांना भोपळाही फोडता नाही आला
शिवेंद्रराजे यांच्या गटाने सर्व 18 जागा जिंकून खासदार उदयनराजेंना धक्का दिला आहे. तर खासदार उदयनराजे भोसले गटाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलच्या आडून बाजार समितीत प्रवेश करण्याचा डाव फसल्याचे बोलले जात आहे.
सातारा : सातारा बाजार समिती निवडणुकीत (Satara Market Committee) आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांच्या गटाने वर्चस्व राखलं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना व खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) यांच्या गटाचा सुपडा साफ करत सत्ता आपल्याकडे खेचून आणली आहे. शिवेंद्रराजे यांच्या गटाने सर्व 18 जागा जिंकून खासदार उदयनराजेंना धक्का दिला आहे. तर खासदार उदयनराजे भोसले गटाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलच्या आडून बाजार समितीत प्रवेश करण्याचा डाव फसल्याचे बोलले जात आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनेलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सातारा बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली आहे. दरम्यान, आमदार शिवेंद्रराजे यांनी विजयावर प्रतिक्रिया देताना, बाजार समितीतून उदयनराजेंना हद्दपार केलचं आहे. आता नगरपालिकेतूनही हद्दपार करू असा विश्वास व्यक्त केला.