अयोध्येला जा नाहीतर गुवाहाटीला जा, पण निकाल मात्र ‘यांच्याच’ हातात; पृथ्वीराज चव्हाण यांचा शिवसेनेला टोला
Prithviraj Chavan On CM Eknath Shinde Ayodhya Daura : काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच ईव्हीएमवरही प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
कराड, सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलंय. अयोध्याच नव्हे तर काशी गुवाहाटी ही करा. कितीही देव पाण्यात ठेवले तरी निकाल न्यायमूर्तींच्याच हातात आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. तसंच ईव्हीएमवरही त्यांनी भाष्य केलंय. ईव्हीएमचा मुद्दा मतभेदाचा आहे. लोकांचा ईव्हीएम व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. आम्हा विरोधीपक्षांची मागणी आहे की, ईव्हीएम ऐवजी बॅलेटपेपर मतदान घेण्यात यावं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. ते साताऱ्यातील कराडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
Published on: Apr 09, 2023 07:26 AM
Latest Videos