शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात भेट; पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…
Prithviraj Chavan on Sharad Pawar and Gautam Adani Meeting : अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
कराड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात आज भेट झाली आहे. या भेटीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोक अडचणीत आल्यानंतर वाचण्यासाठी प्रयत्न करतात. तशी अदानी धडपड करत असेल. त्यासाठी त्यांनी भेट घेतली असावी, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर ही पृथ्वीराज चव्हण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार यांनी काही निर्णय घेतला तर महाविकास आघाडीवर परिणाम होईल. मात्र त्यांनी निर्णय घेतील असं वाटत नाही. अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेवर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Apr 20, 2023 03:19 PM
Latest Videos