आता लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात; अजित पवारांची नाव न घेता शिंदेवर टीका
आता मात्र पूर्वीसारखे माणसं पाहायला मिळत नाहीत. उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात. वेगवेगळ्या प्रकारचा त्रास दिला जातोय
सातारा : वडूज येथे दादासाहेब ज्योतीराम गोडसे यांच्या 90 व्या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमास विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सध्याच्या सरकारवर नाव न घेता टीका केलीये. अजित पवार यांनी शरद पवार आणि अण्णांच्या अतिशय स्नेहाचे संबंध असल्याचे सांगितले. तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पन्नास वर्षे बँकेमध्ये संचालक म्हणून काम केलं. हे कोणाला शक्य नाही.
अलीकडच्या काळामध्ये कोण कधी बदलेल आणि कोण काय सांगेल काही सांगता येत नाही. पूर्वी कसे शब्दाला वजन होतं. एकदा शब्द दिला की पक्का असायचा. परंतु आता मात्र पूर्वीसारखे माणसं पाहायला मिळत नाहीत. उगवत्या सूर्याला नमस्कार करत असतात. वेगवेगळ्या प्रकारचा त्रास दिला जातोय. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण केल्या जातात. नाईलाजास्तव काहींना निर्णय घ्यावे लागतात असा टोला नाव न घेता शिंदे गटाला लगावला आहे.