साताऱ्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक, आरोपींना 24 तासात अटक करा, शशिकांत शिंदेंची मागणी

| Updated on: May 06, 2021 | 6:27 PM

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगड फेक केल्याची घटना समोर आली आहे. कारमधून आलेल्या व्यक्तीं दगडफेक करुन फरार झाल्या आहेत. सातारा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या काही मंडळींनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या रागातून काही युवकांनी दगडफेक केल्याची प्राथमिक […]

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगड फेक केल्याची घटना समोर आली आहे. कारमधून आलेल्या व्यक्तीं दगडफेक करुन फरार झाल्या आहेत. सातारा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या काही मंडळींनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या रागातून काही युवकांनी दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे.