राष्ट्रवादीच्या बंडानंतर सतेज पाटील यांती पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मविआची वज्रमूठ सभा आता...

राष्ट्रवादीच्या बंडानंतर सतेज पाटील यांती पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मविआची वज्रमूठ सभा आता…”

| Updated on: Jul 10, 2023 | 10:01 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यातल्या या महाभूकंपावर काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणं देखील महत्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यातल्या या महाभूकंपावर काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणं देखील महत्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असली तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही यापुढेही एकत्रच काम करणार आहोत. राज्यात पावसाळ्यानंतर वज्रमूठ सभा देखील होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ज्याचं संख्याबळ जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता असल्याचं सूत्र मान्य केलं आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्ष नेते पदाबाबतचा निर्णय होणे अपेक्षित असल्याच आहे.”

Published on: Jul 10, 2023 10:01 AM